ऍड. वर्षा फडके यांना जामीन

उच्च न्यायालयाचा आदेश


पुराव्यामध्ये ढवळाढवळ न करण्याचा अटीवर जामीन

 

पुणे – गुंड बापू नायर याच्या टोळीला मदत केल्याप्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या महिला वकील वर्षा फडके यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. पुराव्यामध्ये ढवळाढवळ न करण्याच्या अटीवर 1 लाख रुपयांचा जामीन न्यायमूर्ती साधना जाधव यांनी मंजुर केला आहे.
एका प्रकरणात नायर याची आई, पत्नी पोलिसांच्या ताब्यात असताना त्यांच्या अटकेची परवानगी लष्कर न्यायालयाने दिली होती. त्यावेळी अटकेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे, असे खोटे शपथपत्र दाखल करुन त्या दोघींना स्वत:चे ताब्यात घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोघींना न्यायालयात हजर न करता पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणात ऍड. वर्षा यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना मोक्का लावण्यात आला होता. या प्रकरणात बचाव पक्षातर्फे ऍड. रोहन नहार, ऍड. मंगेश देशमुख आणि ऍड. अशोक मुंदरगी यांनी यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. ऍड. फडके यांच्यावर यापूर्वी एकही गुन्हा दाखल नाही, त्यांना जामीन मंजुर करावा, अशी मागणी केली होती. ती न्यायालयाने मंजुर केली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)