ऍड. गडलिंग आणि प्रा.सेन यांच्या जामिनावर 14 सप्टेंबर रोजी सुनावणी

पुणे- बंदी घातलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केलेल्या ऍड. सुरेद्र गडलिंग आणि प्रा. शोमा सेन यांच्या जामिनावर 14 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. सत्र न्यायाधीश के. डी. वडणे यांच्या न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. दि. 31 डिसेंबर 2017 रोजी शनिवारवाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चिथावणीखोर भाषणे करण्यात आली असल्याचा आरोप करत तुषार दामगुडे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर एप्रिल महिन्यात या प्रकरणात ऍड. सुरेद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, रोना विल्सन, सुधीर ढवळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यापैकी ऍड. गडलिंग आणि प्रा. सेन यांनी ऍड. रोहन नहार आणि ऍड. राहुल देशमुख यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी दि. 14 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्या दिवशी सरकारी आणि बचाव पक्षाचा युक्‍तीवाद होणार आहे.

पुस्तके आणि कागदपत्रे देण्याच्या अर्जावरही सुनावणी
येरवडा कारागृहात असलेल्या या प्रकरणातील आरोपी ऍड. सुरेंद्र गडलिंग याला पुस्तके आणि कागदपत्रे देण्यात यावी, असा आदेश यापूर्वी न्यायालयाने दिला होता. मात्र, यास जेल प्रशासनाने आक्षेप घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर गडलिंग याला पुस्तके आणि कागदपत्रे मिळावी, असा अर्ज बचाव पक्षाकडून करण्यात आला आहे. त्यावरही दि. 14 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)