कराड, दि. 11 (प्रतिनिधी) – येथील भाजपचे नगरसेवक सुहास जगताप यांच्या पायावर छोटी शस्त्रक्रिया झाल्याने त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतीच त्यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. त्यानंतर ऍड. उदयसिंह पाटील हेही जगताप यांच्या घरी गेल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
राजकारण हे ज्या-त्या वेळी होतेच, परंतु पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून आ. पृथ्वीराज चव्हाण आणि ऍड. उदयसिंह पाटील यांनी भाजपचे नगरसेवक सुहास जगताप यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतली. हे जरी खरे असले तरी त्याची चर्चा मात्र वेगवेगळ्या अंगाने होत आहे. राजकारणात कोण, कोणाचा हाडवैरी नसतो. त्यामुळे भाजप नगरसेवकाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी कॉंग्रेसची नेते मंडळी जाणे, याला राजकीय जोड देता येत नाही. तथापि, या दोन्ही नेत्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चा तर होणारच!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)