ऍट्रॉसिटी कायद्यातील दुरुस्ती विरोधात काही राज्यांमध्ये कडकडीत बंद

पाटणा/ भोपाळ/ जयपूर – अनुसुचित जाती, जमाती कायद्यात अलिकडेच करण्यात आलेल्या दुरुस्तीविरोधात आज उत्तरेकडील काही राज्यांमध्ये बंद पाळण्यात आला. या “भारत बंद’ दरम्यान बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये रेल्वे आणि रस्ते वाहतुक रोखण्यात आली. या राज्यांमध्ये दुकाने आणि बाजारपेठाही बंद करण्यात आल्या होत्या. शाळा आणि अन्य व्यवसायिक ठिकाणेही या राज्यांमधील काही ठिकाणी बंद होती. मात्र आरक्षणाला विरोधी संघटनांनी पुकारलेल्या या बंदला देशात अन्यत्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

सवर्णांच्या सुमारे 150 संघटना आणि इतर मागासवर्गीय समाजातील काही संघटनांनी मिळून हा भारत बंद पुकारला होता, असे ब्रह्म समागम सवर्ण जनकल्याण संघटनेचे अध्यक्ष धर्मेंद्र शर्मा यांनी सांगितले.

उत्तरेकडील राज्यांमध्ये विशेषतः बिहारमध्ये हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या. बंद समर्थकांनी पाटण्यातील राजेंद्र नगर टर्मिनसमध्ये धुडगुस घातला आणि रेल्वे वाहतुकीत सुमारे 30 मिनिटे अडथळे आणले. बिहारमधील रायगिरमध्येही रेल्वे वाहतुकीत अडथळा आणला गेला. उत्तर प्रदेशात मुझफ्फरपूरमध्ये बंद समर्थकांनी बाजारपेठा बंद केल्या आणि राष्ट्रीय महामार्गावरची वाहतुक रोखून धरली. आंदोलनकर्त्यांनी रस्त्यांवर पेटते टायर रोखून वाहतुक रोखली. काही ठिकाणी पोलिसांबरोबर संघर्षाच्याही घटना घडल्या.

राजस्थानातील जयपूर, करौली, प्रतापगड, उदयपूर, पाली, नागौर आदी जिल्ह्यांमध्ये दुकाने, उद्योग केंद्रे, शाळा आणि शिक्षण संस्थाही बंद राहिली. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्येही या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)