ऍटर्नी जनरल वेणुगोपाल यांची केरळसाठी एक कोटींची मदत

नवी दिल्ली – केरळात महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून परिस्थिती बिकट बनली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले आहेत. ऍटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनीही केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

ही रक्कम वेणुगोपाल यांनी केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केली आहे. तसेच वेणुगोपाल यांचे पुत्र, वरिष्ठ वकील कृष्णन वेणुगोपाल यांनीही 15 लाखांची मदत केली आहे. दिल्लीतील वकिलांच्या एका ग्रुपने केरळमधील पुरग्रस्तांसाठी आवश्‍यक वस्तू पाठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयासमोर मदतनिधी जमा करण्यास सुरूवात केली आहे. या ग्रुपकडून पुरग्रस्तांसाठी कपडे, सॅनिटरी नॅपकिन्स, बिस्किटे, वॉटर बॉटल्स इत्यादी वस्तूही पाठविल्या जाणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कुरियन जोसेफ आणि न्यायमूर्ती के एम जोसेफ यांनी मदत निधी जमा करणाऱ्या वकिलांचे समर्थन केले आहे. याशिवाय वरिष्ठ ऍड. जयदिप सिंग आणि ऍड. चंदर उदय सिंग यांनी प्रत्येकी पाच लाखांचा निधी दिला आहे. तसेच सुप्रिम कोर्ट बार असोसिएशनने 30 लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)