ऍग्रो ऍम्ब्यूलन्सद्वारे शेतकऱ्यांना मिळणार कृषि विषयक मार्गदर्शन

जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाची योजना

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 27 – शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण आणि काळजी कशी घ्यावी, यासह पिकांवर पडणारी विविध कीड, आवश्‍यक औषधे या सर्व बाबींविषयी मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यात “ऍग्रो ऍम्ब्युलन्स’ सुरू करण्यात येणात येणार आहे. या ऍम्ब्युलन्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयीचे मार्गदर्शन आणि कृषी विषयक सल्ला, उपाययोजना देण्यात येणार आहे. कृषी उत्पादन वाढ होण्यासाठी या सेवेचा नक्कीच फायदा होणार असून, या पथदर्शी योजनेसाठी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

ऍग्रो ऍम्ब्युलन्स ही सेवा यावर्षी प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार आहे. कृषी दिनी (1 ऑगस्ट) या सेवेची सुरवात केली जाणार आहे. कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची प्रसिद्धी या माध्यमातून करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार यांनी दिली. जिल्हाभर फिरणाऱ्या या ऍम्ब्युलन्ससाठी टोल फ्री क्रमांक, व्हॉट्‌सऍप क्रमांक जाहीर करण्यात येणार आहे. त्यावर शेतकऱ्यांनी त्याच्या शेतातील पिकांचे व कीडीचे फोटो पाठविल्यास त्याबाबतही तज्ज्ञांकडून त्याना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राज्यासह देशभरात कृषी विषयक अनेक प्रयोग राबविले जातात. शेतकऱ्यांच्या यशोगाथा, कृषी विषयक नवीन संकल्पना, सेंद्रीय, रासायनिक अंश (रेसिड्यू) विरहित उत्पादन, औषध फवारणी करताना घ्यावयाची काळजी, यांत्रिकीकरणाचा प्रभावी वापर यांचा प्रचार आणि प्रसार सामान्य शेतकऱ्यांपर्यंत करण्यासाठी “ऍग्रो ऍम्ब्यूलन्स’ सेवा उपयुक्त ठरणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

चौकट
असा होणार सेवेचा प्रसार
“ऍग्रो ऍम्ब्युलन्स’ मध्ये एलसीडी, अधिकारी यांच्या माध्यमातून मार्गदर्शन, युवा शेतकऱ्यांच्या नवीन संकल्पना, सेंद्रीय, पिकांवर येणारे कीड रोग, त्याची प्रतिकार शक्ती, किड रोग नियंत्रणासाठी योग्य औषध वापराचा सल्ला देणे, नैसर्गिक आपत्ती यामुळे पिकाना फटका बसल्यास शेतकऱ्यांनी त्यातून बाहेर कसे यावे याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची गरज व मागणीनुसार त्यांना सल्ला देणे, यवतमाळ येथे घडलेल्या विषबाधेच्या प्रकारनंतर औषध फवारताना कोणती काळजी घ्यावी. याच बरोबर कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा प्रसिद्धी देण्यासाठी या ऍम्ब्युलन्सचा वापर केला जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)