ऍक्‍सिस बॅंकेकडून व्याजदरात कपात

मुंबई, – पगारदार व्यक्तीसाठी ऍक्‍सीस बॅंकेनेही 30 लाखापर्यंतच्या घराचे व्याजदर 0.30 टक्‍क्‍यानी कमी करून आता ते 8.35 टक्के केले आहेत.
या अगोदर स्टेट बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसीने या व्याजदरात कपात केली होती. मात्र यात बॅंकेने महिलांचा किंवा इतर ग्राहकांचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे सर्वच पगारदार ग्राहकासाठी हे नवे व्याजदर असतील असे समजले जात आहे.
इतर बॅंकानी पगारदार महिलासाठी व्याजदर 0.05 टक्के कमी केले आहेत. बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव आनंद यांनी सांगीतले की किफायतशीर घराची आवश्‍यकता आहे. त्यामुळे आम्ही व्याजदर कमी केले आहेत. नोटाबंदीनंतर बॅंकात मोठ्या प्रमाणता ठेवी जमा झाल्या आहेत. त्याचा सदुपयोग व्हावा म्हणून बॅंका हा निर्णय घेत असल्याचे काही बॅंक अधिकाऱ्यानी सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)