ऋषी कोरडे यांना आयआयटीमध्ये सुवर्णपदक

पिंपोडे बुद्रुक, दि. 6 (वार्ताहर) – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी वाराणसी येथे इंटिग्रेटेड एमटेकमध्ये ऋषी संजय कोरडे यांनी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होवून सुवर्णपदक पटकावले.
ऋषी कोरडे यांनी केमिकल इंजिनिअरिंगमधील विशेष शाखा असलेल्या इंडस्ट्रियल केमिस्ट्रीमध्ये पाच वर्षातील आठ सेमिस्टरमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच त्यातील सहाव्या सेमिस्टरला दहापैकी दहा पॉंइंटर मिळवले आहेत. पदवी अभ्यासक्रम सुरू असतानाच त्यांचे संशोधन सुरू होते. या काळात प्रा. एम. ए. कुरेशी व प्रा. जयकुमार कंडासामीयांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)