ऋषी कपूर यांना कॅन्सर तर नाही? ‘त्या’ पोस्टनंतर चर्चेला उधाण

बाॅलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर हे प्रकृती ठिक नसल्यामुळे अमेरिकेत उपचार घेत आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी नीतू सिंग कपूर ही देखील आहे. स्वत: ऋषी कपूर यांनी मागील महिन्यात 29 सप्टेंबर रोजी ट्विटरवरून त्यांच्या आजाराबाबत माहिती दिली होती. तसेच त्यावरील उपचारासाठी मी अमेरिकेला जात आहे असे सांगितले होते.

त्यानंतर काही दिवसापूर्वी ऋषी कपूर हे कॅन्सरने ग्रस्त असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्यांच्या कुंटूबियांनी पुढे येत ऋषी कपूर हे तब्येत ठिक नसल्यामुळे अमेरिकेतील न्युयाॅर्कमध्ये उपचार घेत असल्याची माहिती दिली होती. त्यातच नव वर्षाच्या उत्साहासाठी रणबीर कपूर, आलिया भट्ट, ऋषी कपूर, नीतू सिंग, रिद्धिमा कपूर सेलिब्रेशनमध्ये सामील झालेत. या सेलिब्रेशनचा एक फोटो नीतू सिंग यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी दिलेले कॅप्शन बरेच ‘सूचक’ आहे. ‘नवीन वर्षांचा काहीच संकल्प नाही. केवळ प्रदूषण कमी होऊ देत. आशा आहे की, भविष्यात ‘कॅन्सर’ हे फक्त एका राशीचेचं नाव असेल. गरिबी कमी होऊ आणि भरपूर प्रेम व सुदृढ आरोग्य लाभू दे…’, असे नीतू सिंग यांनी या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)