बॉलिवूडमध्ये 100 हून अधिक रोमांटिक चित्रपट करणारे दिग्गज अभिनेता ऋषि कपूर यांचा वाढदिवस आहे. ऋषि कपूर यांचा 4 सप्टेंबर 1952 रोजी जन्म झाला असून त्यांचा आज 66 व्या वर्षात पदार्पण केले. एक उत्कृष्ट अभिनेता असलेले ऋषि कपूर कौटुंबिक जीवन जगत आहेत. पत्नी नीतू कपूर, मुलगा रणबीर कपूर आणि मुलगी रिद्धिमा कपूर-साहनी यांच्याबाबत त्यांचे प्रेम जगजाहीर आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त रिद्धिमाने आपल्या वडिलांना खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

ऋषिची मुलगी रिद्धिमाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. यातील एक फोटो कोलाज आहे, तर दुसरा फोटो हा एका जुन्या मॅगझीनमधील कव्हर पेज आहे. या फोटोंमध्ये वडील आणि मुलीचे एकमेकांबाबत असलेले स्नेह दिसून येते. कोलाज केलेल्या फोटोत ऋषि कपूर, रणबीर कपूर आणि रिद्धिमासह कुटुंबातील अन्य सदस्य आहेत. या फोटोला कॅप्शन देत रिद्धिमाले लिहिले की, पापा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!! तसेच तिने #loveyouendlessly असे लिहिले.

दुस-या फोटोला कॅप्शनमध्ये रिद्धिमा म्हणते, माझे वडीलच माझे खरे हिरो आहेत. पप्पा वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा! या फोटोंना हजारो लाइक्‍स मिळाले असून चाहत्यांनीही कॉमेंट देत ऋषि कपूर यांना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)