ऋषभ पंतला वाढता पाठिंबा

ओव्हल कसोटी सामन्यात ऋषभ पंतने झळकावलेले पदार्पणातील शतक आणि राजकोट येथील कसोटीत त्याने फटकावलेल्या 92 धावा यामुळे ऋषभला लवकरात लवकर संधी देण्यासाठी मागणी वाढत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पुढच्या वर्षी होणाऱ्या विश्‍वचषक स्पर्धेपर्यंत धोनी खेळणार हे आम्हाला निश्‍चितच माहीत आहे.

परंतु त्यानंतर का होईना, धोनीला पर्याय शोधावाच लागणार आहे. त्यामुळेच सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावरील स्फोटक फलंदाज असलेल्या ऋषभ पंतला धोनीची जागा घेण्यासाठी तयार करण्यात काहीच वावगे नाही. शिवाय ऋषभ केवळ 20 वर्षांचा असून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव घेण्यासाठी पुरेशी संधी आहे.

ऋषभ पंतच्या यष्टीरक्षणात त्रुटी असल्याचे माजी यष्टीरक्षक आणि निवड समिती अध्यक्षांनी म्हटले आहे. परंतु या त्रुटी काढून टाकण्यासाठीही त्याच्याकडे पुरेसा वेळ असल्याचे मत या पदाधिकाऱ्यांनी व्यक्‍त केले. शिवाय 2019 विश्‍वचषक स्पर्धेपर्यंत धोनी एकदिवसीय आणि टी-20 भारतीय संघात राहणारच आहे. तोपर्यंत ऋषभ पंतला नियोजनबद्ध रीतीने तयार करणे शक्‍य आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या पुढच्या दशकभराची यष्टीरक्षणाची समस्या सुटू शकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)