साऊथहॅम्पटन, – भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशी उपहारापर्यंत इंग्लंडने 3 बाद 92 अशी मजल मारली. काल दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने बिनबाद 6 धावा केल्या होत्या.

भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने कसोटी पदार्पणात फलंदाजी आणि यष्टिमागे उल्लेखनीय कामगिरी करताना सर्वांचे लक्ष वेधले. पण, दुसऱ्या कसोटी पंतच्या नावे नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. साऊदम्पट कसोटीत सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पंतने संयमी खेळ करताना चेतेश्वर पुजाराला साथ दिली. मात्र, 29 चेंडूंचा सामना केल्यानंतर इंग्लंडच्या मोईन अलीने त्याला पायचीत केले.

पंतने 47 मिनिटे खेळपट्टीवर ठाण मांडला होता, परंतु त्याला एकही धाव करता आली नाही. 29 चेंडूंचा सामना केल्यानंतर भोपळाही फोडू न शकण्याचा विक्रम आता पंतच्या नावावर जमा झाला आहे. त्याने भारताचा इरफान पठाण आणि सुरेश रैना यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. सर्वाधिक चेंडूचा सामना करून शुन्यावर बाद होणारा 20 वर्षीय पंत हा तिसरा भारतीय खेळाडू आहे. याआधी इरफान पठाण ( वि. पाकिस्तान 2014-15) आणि सुरेश रैना ( वि. इग्लंड 2011) यांना 29 चेंडू खेळूनही एकही धाव करता आली नव्हती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)