ऋतुजा, मेखला, करीम, अर्जुन अंतिम फेरीत

रवाईन हॉटेल योनेक्‍स-फ्युचर स्टार सुपर सिरीज्‌ टेनिस स्पर्धा
पाचगणी, दि.20 – रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या रवाईन हॉटेल योनेक्‍स-फ्युचर स्टार सुपर सिरीज्‌ 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात ऋतुजा चाफळकर, मेखला मल्ला यांनी, तर मुलांच्या गटात करीम खान, अर्जुन कुंडू या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरी गटात उपांत्य फेरीत मुलांच्या गटात सहाव्या मानांकित करीम खानने चौथ्या मानांकित चिराग दुहानचा टायब्रेकमध्ये 7-6 (3), 6-4 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. तिसऱ्या मानांकित अर्जुन कुंडूने पाचव्या मानांकित धन्या शहाचे आव्हान 7-6 (5), 7-6 (5) असे मोडीत काढत संघाला मिळवून दिला. दुहेरीत वर्धन कारकलने करीम खानच्या साथीत अर्जुन गोहड व दीप मुनीम यांचा 4-6, 6-2, 10-4 असा संघर्षपूर्ण पराभव करत आगेकूच केली. तर, दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अर्जुन कुंडू व धन्या शहा यांनी सन्मय गांधी व मानव जैन या जोडीचा 5-7, 6-2, 10-5 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
मुलींच्या गटात उपांत्य फेरीत दुसऱ्या मानांकित मेखला मल्ला हिने साक्षी मिश्राला 6-4, 6-1 असे पराभूत केले. सहाव्या मानांकित व पुण्याच्या ऋतुजा चाफळकरने सातव्या मानांकित आपली शहर सहकारी राधिका महाजनचा 6-0,6-2 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुहेरीत याच गटात सिया बाऊर व मेखला मल्ला या जोडीने हृदया शहा व रिया वाशीमकर यांचा 6-4, 6-1 असा तर, वैष्णवी आडकर व ऋतुजा चाफळकर यांनी हर्षाली मांडवकर व भूमिका त्रिपाठी यांचा 6-1, 4-6, 10-4 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी: मुले
करीम खान(6) वि.वि. चिराग दुहान(4) 7-6(3), 6-4
अर्जुन कुंडू(3)वि.वि. धन्या शहा(5) 7-6(5), 7-6(5)
मुली:
मेखला मल्ला(2) वि.वि. साक्षी मिश्रा 6-4, 6-1
ऋतुजा चाफळकर(6) वि.वि. राधिका महाजन(7)6-0,6-2
दुहेरी- उपांत्य फेरी- मुले
वर्धन कारकल / करीम खान वि.वि.अर्जुन गोहड/ दीप मुनीम 4-6, 6-2, 10-4;
अर्जुन कुंडू/ धन्या शहा वि.वि.सन्मय गांधी/ मानव जैन 5-7, 6-2, 10-5;
मुली:
सिया बाऊर/मेखला मल्ला वि.वि.हृदया शहा/रिया वाशीमकर 6-4, 6-1;
वैष्णवी आडकर/ऋतुजा चाफळकर वि.वि.हर्षाली मांडवकर / भूमिका त्रिपाठी 6-1, 4-6, 10-4
फोटो आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)