ऋतुजाची राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड

पुणे: ऋतुजा गोरे हिने राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी आगेकूच केली आहे. औरंगाबाद येथील विभागीय क्रीडा संकुलात नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत ऋतुजाने 19 वर्षाखालील मुलींच्या गटात उत्कृष्ट कामगिरी करीत नाशिकच्या खेळाडूचा 37-11 असा थेट पराभव करीत सुवर्णपदक पटकावले. त्यासह राष्ट्रीय परिषदेसाठी तिची निवड झाली.

ऋतुजा गेल्या 11 वर्षांपासून तायक्वांदोचा सराव करीत असून, आतापर्यंत तिने राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत पदके मिळवली आहेत. तिच्या या यशाबद्दल सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. संजय चोरडिया, संस्था विकास व्यवस्थापक सिद्धांत चोरडिया व संस्थेतील शारीरिक शिक्षण संचालक प्रा. निशिगंधा पाटील, प्रा. संकेत नालकर यांनी ऋतुजाचे अभिनंदन केले. राष्ट्रीय स्पर्धा 2 ते 6 जानेवारी 2019 या कालावधीत मध्यप्रदेशातील विदिशा येथे होणार आहे. या स्पर्धेत पदक मिळवून आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यासाठी ती प्रयत्न करीत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)