ऋचा चढ्ढा शिकते आहे बेली डान्स

ऋचा चढ्ढा सध्या बेली डान्स शिकते आहे. तिने बेली डान्सर बनून प्रेक्षकांना एक झक्‍कास सरप्राईज द्यायचा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन आठवड्यापासून ती एका क्‍लासला जायला लागली आहे. दक्षिणात्य अभिनेत्री शकिलाच्या बायोपिकमध्ये एका प्रमोशनल गाण्यात ती बेली डान्स करताना दिसणार आहे. हा बेली डान्स शिकण्यासाठी मुंबईतील प्रशिक्षक शैना लेबानाच्या क्‍लासला ती जायला लागली आहे. तिचे हे प्रशिक्षण सुरू आहे आणि आणखीन काही आठवडे तरी तिला हे ट्रेनिंग घ्यायला लागणार आहे. प्रत्येक नवीन गोष्ट शिकणात नवीन मजा असते. आता तर बेली डान्ससारखा एनर्जी असलेला डान्स शिकायचा म्हणजे तर खूपच मजा येते आहे, असे ऋचा म्हणाली.

शकिलाने सिल्क स्मिताप्रमाणेच तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड सिनेमात हॉट अॅक्‍ट्रेस म्हणून नाव कमावले होते. त्याशिवाय अगदी बी ग्रेड सिनेमा आणि पॉर्न फिल्म्समध्येही तिचे नाव घेतले जायचे. तिच्या बायोपिकमध्ये तिचा रोल साकारायचा म्हणजे बोल्डनेस हा अविभाज्यपणे अपेक्षित विषय आहे. आतापर्यंतच्या करिअरमध्ये हा रोल म्हणजे तिची खास ओळख निर्माण करणारा ठरेल असे ऋचाला वाटते आहे. विद्याने सिल्क स्मिताचा रोल केला तेंव्हा जेवढी क्रेझ निर्माण झाली होती, तोच अनुभव सध्या शकिलाच्या रोलसाठी ऋचा घेते आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तिच्याबाबत आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ती कबड्डीही शिकण्याच्या तयारीत आहे. “पंगा’ या मुलींच्या कबड्डीवरील सिनेमात ती कंगणा रणावत बरोबर असणार आहे. मेरी कोम, साईना नेहवाल आणि सानिया मिर्झाचे बायोपिक वगळता “चक दे इंडिया’सारख्या टीम स्पोर्टचा एखादाच सिनेमा इतक्‍या वर्षात येऊन गेला आहे. कित्येक वर्षांपूर्वी अश्‍विनी नाचप्पाचा बायोपिकही येऊन गेला होता. आता कबड्डीसारख्या देशी क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देणाऱ्या या सिनेमात काम करायचे आणि अश्‍विनी अय्यर सारख्या डायरेक्‍टरबरोबर आणि कंगणा रणावतसारख्या कसलेल्या अॅक्‍टर बरोबर हे दुप्पट चॅलेंजिंग आहे, असे ऋचा म्हणाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)