ऊस वाहतूक करणाऱ्या बैलाचा ऍटॅकने मृत्यू

मल्हारपेठ – भरलेली ऊसाची गाडी ओढत असताना अचानक धडधाकट बैल रस्त्यातच कोसळला. यामध्ये बैलाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना गव्हाणवाडी, ता. पाटण येथे घडली. दरम्यान, बैलाचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने झाल्याचे पशुवैद्यकीय विभागाने सांगितले. भगवान बापूराव धांडे, रा. बीड हे शुक्रवारी सकाळी ऊसाची बैलगाडी घेऊन देसाई साखर कारखान्याकडे निघाले होते. गव्हाणवाडी-चोपदारवाडी गावच्या चढावर एक बैल अचानकपणे जागेवर कोसळला.

धांडे यांनी बैलगाडीतून उतरुन गाडी उभी केली आणि दुसऱ्या बैलाची सुटका केली. कोसळलेल्या बैलाची तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मृत बैलाच्या तोंडातून लाळ मोठ्या प्रमाणात वाहत होती. प्रभारी पशुधन विकास अधिकारी डॉ. संतोष जाधव यांनी बैलाचा हृदयरोगाच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला असल्याच्या बाबीला दुजोरा दिला.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)