ऊस वाहतूक करणाऱ्या चालकास लुटले

संगमनेर – संगमनेर तालुक्‍यातील साकूर परिसरात उसाचा ट्रक अडवून चालकाला शस्त्राने मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाइल लुटणाऱ्या आरोपीला घारगाव पोलिसांनी अटक केली आहे.

मालट्रक चालक गंगाधर भागा वाळुंज ( 55, रा. गुंजाळवाडी पठार, ता. संगमनेर) यांनी घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील मालट्रक (एमएच. 17 एजी. 2016 )मध्ये ऊस घेऊन ते काथरगाव (ता. निफाड) येथून संगमनेर तालुक्‍यातील कौठेमलकापूर येथील युटेक साखर कारखान्याकडे येत असताना साकूर शिवारात रफीकसिकंदर चौगुले (रा. साकूर) याने ट्रकसमोर त्याच्या ताब्यातील पिकअप आडवी लावून ट्रक रस्त्याच्या खाली घेण्यास सांगितले. मात्र, उसाचा लोड असल्याने गाडी खाली उतरवणे शक्‍य नसल्याचे सांगितल्याचा राग येऊन त्याने वाळुंज यांचा डावा कान व नाकावर धारदार वस्तूने मारून जखमी केले. तसेच, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या खिशातील डिझेलसाठी ठेवलेले सात हजार रुपये व मोबाइल काढून घेतला.

-Ads-

या घटनेविषयी समजल्याने आज सकाळपासून साकूर येथे फिर्यादी व आरोपीच्या समर्थनार्थ मोठा जमाव आमने-सामने आल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता. घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप निघोट व उपनिरीक्षक अन्सार इनामदार यांनी पोलिसांसह साकूर येथे जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. यातील आरोपीने यापूर्वीही अशाच प्रकारे लुटमार केल्याची चर्चा आज साकूरमध्ये सुरू होती. तणावामुळे आज दिवसभर साकूरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. गंगाधर वाळुंज यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)