ऊस, डाळींब, भुईमुगची घ्यावयाची काळजी

ऊस – हुमणीच्या नियंत्रणासाठी 25टक्के क्‍लोरपायरीफॉस 10 लिटर पाण्यात मिसळुन जमीन वाफशावर असताना सरीतुन द्यावे. तसेच पहिला पाऊस झाल्यानंतर बाभुळ व बोर या झाडावरील भुगेरे प्रकाश कंदील व रॉकेलचा वापर करुन सामुदायिकरित्या रात्रीचे वेळी गोळा करुन नष्ट करावे.

कापूस – मागील हंगामातील कपाशीची धस्कटे, पालापचोळा जमा करुन कंपोस्ट खड्ड्‌यात टाकावा, त्यामुळे त्यावर असलेल्या किडींच्या अवस्था नष्ट होतील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भुईमुग – पाने खाणारी अळी व पाने गुंढाळणारी अळीच्या नियंत्रणासाठी 4 मिली सायपरमेथ्रिन 20 ईसी किवा 10 मिली डेकामेथ्रिन 2.8 ईसी 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारावे.

साठविलेले धान्य – या धान्यातील किडींचा प्रादुर्भाव मुख्यत्वे त्यात असलेल्या ओलाव्याच्या प्रमाणावर अवलंबून असतो. साठवणीसाठी धान्यातील ओलावा 10टक्के पेक्षा कमी राहील अशी काळीा घ्यावी. त्यासाठी धान्य उन्हात चांगले वाळवावे. लसूण घास स्पोडोप्टेरा अळीच्या व्यवस्थापनासाठी 1 मिली एस.एल.एन.पी.व्ही. + 5 ग्रॅम बिव्हेरिया बॅसिआन 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

डाळिंब – खोडकिडा नियंत्रणासाठी छिद्रामधे ईोक्‍शाव्दारे 10 मिली डायक्‍लोरोव्हॉस 76टक्के, 5 मिली फोव्हलरेट 20टक्के प्रवाही प्रति लिटर पाण्यातुन मिसळुन द्रावण तयार करावे आणि हे द्रावण तयार करावे आणि हे द्रावण छिद्रामध्ये सोडावे व छिद्रे चिखलाने बंद करावीत.

गुलाब – लाल कोळी या किडीच्या नियंत्रणासाठी 15 मिली डायकोफॉल (केलथो) 18.5टक्के मिली ऍबॅमेक्‍टीन 1.8टक्के प्रवाही प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. खरीप नियोजन-पूर्व मशागत पूर्ण झालेली असल्यास पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी मध्यम जमिनीत वाफे आणि भारी जमिनीत सरी वरंबे करावेत. खरीप हंगामात भाजीपाल्यांची लागवड करण्यासाठी यांच्याकडे पाण्याची सुविधा आहे त्यांनी रोपे तयार करण्यासाठी रोपवाटीका तयार करावी व स्वत: चांगले रोपे तयार करावीत.

आपल्या शेतातील मातीचा नमूना त्यात अन्नद्रव्यांचे प्रमाण, जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक म्हणजेच सामू तपासून जमिनीबाबतचे माहिती घेणे आवश्‍यक आहे. खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी दर्जेदार व प्रमाणीत बियाण्यांचे नियोजन करावे.

कृषि अभियंत्रिकी – खरीप हंगामासाठी शेत तयार करण्यासाठी नांगरट करणे, ढेकळे फोडणे, पाळी देणे अशी कामे पूर्ण करावीत. बैलजोडीने कामे करत असल्यास कामे सकाळच्या सत्रात आटोपून घ्यावी.

पावसाळी नियोजन – हवामान विभागाने ह्या वर्षी सरासरी पेक्षा जास्त पावसाची अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार चर, विहीर, तलाव यामधील गाळ किवा अडथळे काढुन घ्यावेत. तसेच पाणी जमीनीत जास्त मुरेल व वाहणार नाही याचा प्रयत्न करावा. पावसाचे घराच्या छतावर पडणारे पाणी पाईपद्वारे एखाद्या टाकीत जमा करावे व त्याचा वापर विहीर पुनर्भरण किंवा कूपालिका पुनर्भरण किंवा घरगुती कामाकरीता वापर करावा. विहीर व बोअरवेल पुनर्भरण करून घ्यावे.

पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज
मागील आठवडयात कमाल तापमान 38.0 ते 41.2 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते तर किमान तापमान 21.5 ते 27.9 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. वाऱ्याचा वेग ताशी 1.3 ते 7.5 कि.मी होता. कमाल आर्द्रता 25 ते 50 टक्के होती तर किमान आर्द्रता 14 ते 31 टक्के होती. अहमदनगर परिसरात पुढील पाच दिवस कमाल तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअस राहील व किमान तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस राहील. दि. 29 व 30 मे रोजी आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आर्द्रता 48 ते 71 टक्के राहील तर किमान आर्द्रता 14 ते 25 टक्के राहील. वाऱ्याचा वेग ताशी 12 ते 21 कि.मी. राहिल.

प्रमुख अन्वेषक 

प्रमुख कृषी विद्या विभाग,

म.फु.कृ.वि, राहुरी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)