ऊस उत्पादन वाढीसाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे – पिचड

पांढरी माशी नियंत्रण चर्चेसाठी बैठक
कृषी शास्त्रज्ञांकडून कीड व्यवस्थापनावर माहिती
अगस्ती कारखान्याकडून किटकनाशकांचा पुरवठा

अकोले – अगस्ती सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्याचा विचार करता उसाचेउत्पादन कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही बाब ध्यानी घेऊन या समस्येवर उपाय काढण्यासाठी सामूहिक प्रयत्न केले जावेत, असे आवाहन अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी केले. अगस्ती कारखाना कार्यस्थळावर पांढरी माशी नियंत्रणासाठीची बैठक झाली. राहुरी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे आणि इतर कंपन्यांचे तज्ज्ञ यावेळी उपस्थित होते.

पिचड म्हणाले, पांढऱ्या माशीचे कोष हजारोंच्या संख्येने तयार होतात. त्यातून तयार झालेली अंडी ऊस पानांना पिवळसरपणा निर्माण करते. ती पानेकरपल्यासारखी दिसतात. त्याचा फटका उत्पादनाला बसणार आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी कारखान्याने रासायनिक औषधांचा पुरवठा सुरु केला आहे. त्याचा लाभ शेतकरी वर्गाने घ्यावा, असेआवाहन त्यांनी केले.

कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, राहुरी कृषी विद्यापीठाचे किटक शास्त्रज्ञ डॉ. अशोक वाळुंज, व्हीएसआयचे कीटक शास्त्रज्ञ डॉ. राजाराम यादव, तालुका कृषी अधिकारी माधव हासे, भानुदास तिकांडे यांनी कीड व्यवस्थापनाबाबत महिती दिली. प्रास्ताविक कार्यकारी संचालक भास्कर घुलेयांनी केले. स्वागत एकनाथ शेळके यांनी केले. सूत्रसंचलन सयाजी पोखरकर यांनी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)