ऊस आंदोलनाची सांगलीत पहिली ठिणगी ; शेतकरी संघटनेने बंद पाडल्या ऊस तोडी 

शेतकरी संघटनेने बंद पाडल्या ऊस तोडी 
3500 रुपये एफआरपी आणि थकीत बिले देण्याची मागणी 

सांगली: ऊस आंदोलनाची पहिली ठिणगी सांगली जिल्ह्यात आज पडली आहे. मागील थकबाकी आणि 3500 रुपये एफआरपी मागणीसाठी शेतकरी संघटना मैदानात उतरली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्‍यातील वड्डी ऐवजी येथे शेतकरी संघटनेने ऊसतोडी बंद पाडले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऊस बिल आणि एफआरपीसाठी शेतकरी संघटनेने रणशिंग फुंकले आहे. 3500 रुपये एफआरपी आणि मागील हंगामातील थकीत चारशे रुपयाच्या मागणीसाठी सांगलीतील शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. यंदाचा हंगाम सुरू होण्याआधी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सांगलीच्या मिरज तालुक्‍यातील वड्डी येथे सुरू असलेली ऊस तोड आज शेतकरी संघटनेने बंद पाडली आहे.

कर्नाटकच्या शिवशक्ती साखर कारखान्यासाठी सुरू असलेली ही ऊसतोड फडात जाऊन ही ऊस तोड बंद पाडली आहे. त्यावेळी ऊसतोड मजुरांना शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पिटाळून लावले. शेतकरी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष महादेव कोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे. जोपर्यंत कारखानदारांकडून शेतकऱ्यांची मागील थकबाकी चारशे रुपये, त्याचबरोबर ऊसाला 3500 रुपये एफआरपी मिळत नाही तोपर्यंत ही कारखाना चालू देणार नाही, असा इशारा यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)