ऊसासाठी सुक्ष्म सिंचन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा

मुख्यमंत्र्यांचे साखर कारखाने व बॅंकांना निर्देश
मुंबई – ऊस पिकाखालील क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याबाबतच्या योजनेची साखर कारखाने व बॅंकांनी प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

ऊसाच्या सिंचनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक घेतली. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, ऊस पिकाखालील क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याबाबतच्या योजनेच्या अंमलबजावणीला अधिक गती देण्याची आवश्‍यकता आहे. साखर कारखाने व बॅंकांनी प्रभावीपणे या योजनेची अंमलबजावणी करावी. जे साखर कारखाने सूक्ष्म सिंचन योजनेची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांचे वीज खरेदी करारनामे रोखण्यात येतील. तसेच ज्या बॅंका या योजनेची अंमलबजावणी करणार नाही त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या योजनेचा साखर आयुक्त कार्यालयाने दररोज साखर कारखाने व बॅंकांकडून अहवाल घ्यावा. सोलापूर, सांगली, अहमदनगर, पुणे व अन्य जिल्हा बॅंकांना राज्य सहकारी बॅंक या योजनेसाठी कर्ज उपलब्ध करुन देणार आहे. ज्या शेतक-यांचे व साखर कारखान्याचे कर्जासाठी अर्ज आले आहेत त्यांना तत्काळ मंजुरी देण्याचे निर्देशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी कृषी व सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार, साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव युपीएस मदान, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सतीश गवई, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, राज्य सहकारी बॅंकांचे प्रतिनिधी, नाबार्ड व सहकारी बॅंकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)