ऊसाला एफआरपी अधिक 200 रुपये द्या, प्रतिटन साडे 9 टक्के रिकव्हरी बेस धरा- राजू शेट्टी 

कोल्हापूर: यंदाच्या हंगामातील उसाला साडेनऊ टक्के बेस पकडून एफआरपी अधिक दोनशे रुपये विनाकपात उसाला दर मिळावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर इथ आज 17 वी ऊस परिषद पार पडली त्यामध्ये राजू शेट्टी यांनी ही मागणी केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 17 वी ऊस परिषद पार पडली दरवर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद होत असल्याने त्यांना शह देण्यासाठी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काही दिवसापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा कोडोली येथे शेतकरी ऊस परिषद आयोजित केली होती. या ऊस परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी एफ आर पी अधिक दोनशे रुपये हाच फॉर्म्युला मान्य केला असला तरी त्यामध्ये रिकवरी चा बेस दहा टक्के धरला होता . त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परीक्षेमध्ये राजू शेट्टी तिी मागणी करतात याच्याकडे राज्यातील शेतकर्यांचा राज्यकर्त्यांचे आणि साखर कारखानदारांचा लक्ष लागून नाही होतं. मुख्यमंत्र्यांनी भरलेला बेस हा बेकायदेशीर असल्याचे म्हणत खासदार राजू शेट्टी यांनी रिकवरी चा बेस्ट दहा टक्के पकडून उसाचा दर मिळाला पाहिजे अशी मागणी केली आहे.
हे सरकार खासदार राजू शेट्टी यांचा नरेंद्र दाभोलकर करण्याच्या तयारीत आहे, असा खळबळजनक आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला. एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर आपल्याला ही माहिती दिली आहे, असे त्यांनी सांगितले.सरकार राजू शेट्टी यांचा नरेंद्र दाभोलकर करण्याच्या तयारीत आहे. मात्र शेट्टी सोडाच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला लावणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांच्या केसाला जरी हात लागला तरी घरात घुसून घुसून मारू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सदाभाऊ खोत यांनी काढलेल्या रयत क्रांती संघटना आणि खासदार राजू शेट्टी यांच्या पासून फुटून गेलेल्या काही कार्यकर्त्यांनी काढलेली ही नवी संघटना यामुळे यंदाच्या ऊस परिषदेवर त्याचा काही परिणाम होतो का अशी चर्चा सुरू होती मात्र नेहमीप्रमाणेच राजू शेट्टी यांच्या ऊस परिषदेला पश्‍चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी तुफान गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)