शिक्रापूर- कोंढापुरी (ता. शिरूर) येथे गरीब व गरजू अशा ऊसतोड कामगार महिलांना युवकांच्या वतीन 15 महिलांना कपडे वाटप करण्यात आले असून युवकांच्या या अनोख्या उपक्रमामुळे युवा पिढीला एक वेगळा संदेश मिळाला आहे. यावेळी मुक्तागंण परिवार फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण कांबळे, शुभम यादव, तुषार कापरे, प्रकाश पट्टेकर, शक्ती केंडे, सुरज गुट्टे, सागर वानखेडे, ऋतिक गायकवाड, दीपक राठोड, ज्ञानेश शिंदे यांसह आदी उपस्थित होते, यावेळी युवकांकडून महिलांना कपडे वाटप करण्यात आल्यानंतर महिला देखील भारावून गेल्या होत्या.
Ads