ऊसतोड मजुरांची पालावरची दिवाळी

लाखणगाव- भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर ऊसतोड मजुरांनी आपली दिवाळी साजरी केली. सध्या दिवाळीचा सण सर्वत्र धुमधडाक्‍यात साजरा होत आहे. ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांची दिवाळी मात्र कारखानास्थळावर साजरी होत आहे.
पश्‍चिम महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने असून, या ठिकाणी मराठवाडा, जळगाव परिसरातील मजूर ऊस तोडण्यासाठी दाखल होत असतात. वर्षातले आठ महिने हे मजूर कारखाना परिसरातच वास्तव्याला असल्याने अनेक सण आणि उत्सव त्यांना कारखाना परिसरातच साजरे करावे लागतात. दिवाळीचा सण सर्वत्र मोठ्या धुमधडाक्‍यात साजरा होत असताना या ऊस तोडणी मजुरांना आपली दिवाळी हे कारखानास्थळावर साजरी करावी लागत आहे. गावाकडे जाऊन दिवाळी साजरी करायची झाली, तर तीन ते चार दिवसाचे खाडे होतात, तसेच जाण्या-येण्याचा खर्चही बराच होतो, त्यामुळे अनेक मजूर गावाकडे न जाता कारखाना परिसरात दिवाळी साजरी करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)