ऊसतोड कामगारांचा सामूहिक विमा काढा -तावरे

मंचर-बिबट्या वाघाच्या उपद्रवामुळे ऊसतोडणी मजूर धास्तावले आहेत. सरकारने ऊसतोड कामगारांचा सामूहिक विमा काढावा. अशी मागणी ऊसतोड मुकादम संघटनेचे अध्यक्ष रावजी तावरे यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाला आहे. ऊस तोडणीसाठी आंबेगाव तालुक्‍यात ऊसतोड मजुरांच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत. ऊसतोड मजूर पहाटे धुक्‍यातच निघून ऊस तोडणीसाठी जात आहेत. उसामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांचे वास्तव्य पाहायला मिळत आहे. उसामध्ये ऊसतोड करत असताना मजुरांना आपला प्राण मुठीत धरून काम करावे लागत आहे. ऊस तोड करत असताना अचानक त्यांना बिबट्याच्या मादीचे दर्शन होते. किंवा बिबट्याच्या पिल्लांचा सामना करावा लागतो. यामध्ये अचानकपणे ऊसतोड मजुरांवर बिबट्या हल्ला करत आहे. या हल्ल्यामध्ये ऊसतोड मजुरांचा प्राण जाण्याची शक्‍यता आहे. तसेच ऊसतोड करत असताना कित्येक ऊसतोड मजुरांना विषारी साप चावून प्राणास मुकावे लागले आहे. तरी शासनाने या ऊसतोड मजुरांच्या समस्येकडे लक्ष देऊन ऊसतोड मजुरांचा कामगारांचा आयुर्विमा काढून त्यांना सरकारकडून होईल ती मदत देणे गरजेचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)