ऊर्ध्व पैनगंगेची अवस्था जायकवाडी प्रकल्पासारखी करू नका : अशोक चव्हाण

नांदेड : पूर्ण क्षमतेने भरणार्‍या जायकवाडी धरणाच्या वरच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी अडविल्यामुळे मागील काही वर्षात हे धरण फार कमी वेळा पूर्ण क्षमतेने भरले. आता तीच अवस्था आता ऊर्ध्व पैनगंगेची होणार असून हे टाळण्यासाठी या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात नव्याने सिंचन प्रकल्प उभारू नका, अन्यथा याही प्रकल्पाची जायकवाडी सारखी अवस्था होईल, अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प हा एक मोठा पाटबंधारे प्रकल्प आहे. मूळ मंजुरीनुसार इसापूर व सापळी या ठिकाणी सिंचन प्रकल्प उभारण्यात आला असून इसापूर धरणापासून निघणारा डावा कालवा 84 कि.मी.चा तर उजवा कालवा 177 कि.मी.लांबीचा आहे. त्यासोबतच सापळी धरणाचा 6 कि.मी.चा पूरक कालवा निर्माण केला आहे. 1968 साली मान्यता दिलेल्या मूळ आराखड्यात 1195 द.ल.घ.मी. पाणीसाठा व त्यातून 120,5126 हेक्टर सिंचन अपेक्षीत होते;परंतु वास्तवात इसापूर धरणाच्या वरील बाजूचा पाणी वापर वाढल्यामुळे 1084 द.ल.घ.मी. पाणी उपलब्ध झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मूळ प्रारुप आराखड्यात बदल करून 2008 मध्ये 75 टक्के विश्वासार्हतेचा इसापूर धरणस्थळी उपलब्ध येवा 620 द.ल.घ.मी. तर सापळीचा 249 द.ल.घ.मी. असा मिळून 869 द.ल.घ.मी. निर्धारित करण्यात आला व उर्ध्व पैनगंगेच्या दोन्ही धरणाच्यावर पाणीवापर 269 द.ल.घ.मी. निर्धारित करण्यात आला. काळानुरूप यात बदल करत-करत 2008 च्या समरूपता अभ्यासानुसार भविष्यकालीन योजनांसाठी पाणी आरक्षित करता येणार नाही, असे असताना सुद्धा पैनगंगा प्रकल्पाची विश्वासार्हता 50 टक्क्यांपर्यंत सिमीत करून पैनगंगा नदीवर अतिरिक्‍त 105 द.ल.घ.मी.पाणी वरच्या भागासाठी वापरण्याचे निर्देशित केले.

एकूण ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्यावर जर असेच पाणी साठवत गेले तर इसापूर आणि सापळी धरणामुळे निर्माण होणारे सिंचन क्षेत्र 10,70090 या ऐवजी 6,40000 इतपर्यंत कमी होईल, त्यामुळे हिंगोली, यवतमाळ व नांदेड जिल्ह्याचा सिंचन अनुशेष वाढेल. त्यासोबतच या धरणावर आधारीत असलेल्या अनेक शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल. त्यामुळे या प्रकल्पावरील खर्च व सद्यस्थितीचा विचार करता उर्ध्व भागात प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात भविष्यकालीन प्रकल्पासाठी कुठल्याही प्रकारची पाणी उपलब्ध करून न देण्याबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा व या तिन्ही जिल्ह्यातील सिंचन अनुशेष वाढू नये याची काळजी घ्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)