उस उत्पादक शेतकऱ्यांची 13 हजार 899 कोटींची थकबाकी

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली  -देशातील साखर उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्यांकडून 13,899 कोटी रुपयांचे देणे बाकी असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. सरकारने 21 मार्चपर्यंतची आकडेवारी दिली आहे. विपणन वर्षाची अखेर सप्टेंबरमध्ये होते. सर्वाधिक देणे असणाऱ्या रकमेत उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांचा पहिल्या तीनमध्ये क्रमांक लागतो.

उत्तर प्रदेशात 5136 कोटी, कर्नाटकात 2,539 कोटी आणि महाराष्ट्रात 2,348 कोटी रुपयांचे देणे बाकी आहे. 21 मार्चच्या आकडेवारीनुसार 55,553 कोटी रुपयांचे देणे बाकी होते. यापैकी 41,654 कोटी रुपयांची रक्कम फेडण्यात आली आहे. आता 13,899 कोटी रुपयांचे देणे बाकी असल्याचे अर्थ राज्यमंत्री सी. आर. चौधरी यांनी सांगितले.
उत्पादन वाढल्याने साखरेच्या किमती बदलत आहेत. त्यामुळे ऊस उत्पादकांना पैसे देताना विलंब होत आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने 228 साखर कारखान्यांना नोटीस पाठवल्या आहेत. साखरेच्या किमतीत घट झाल्याने शेतकऱ्यांना पैसे देताना अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)