उस्मानिया विद्यापीठात राहुल गांधींना प्रवेश नाकारला

हैदराबाद – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उस्मानिया विद्यापीठांतील विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी विद्यापीठाच्या कॅम्पस मध्ये येऊ देण्याची विनंती विद्यापीठाला केली होती पण तेथील प्रशासनाने सुरक्षेचे कारण देत त्यांना तेथे भेट देण्यास अनुमती दिली नाही.

13 आणि 14 ऑगस्टला त्यांनी तेथे परवानगी मागितली होती. पण त्यांना तेथे अनुमती द्यायची तर त्यांच्यासाठी सुरक्षेची मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे तथापी विद्यापीठाकडे इतक्‍या सुरक्षेची व्यवस्था नाहीं म्हणून आम्ही त्यांना ही अनुमती दिली नाही अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू गोपाल रेड्डी यांनी दिली. तथापी स्थानिक पोलिसांनी अथवा एसपीजीने त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली तर त्यांना विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये अनुमती देण्याबाबत आम्ही फेरविचार करू शकतो असे ते म्हणाले.

विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या निमंत्रणावरूनच राहुल गांधी तिकडे जाणार होते अशी माहिती प्रदेश कॉंग्रेसकडून देण्यात आली. दरम्यान राहुल गांधी यांनी अनुमती द्या अन्यथा राजीनामा द्या अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी कुलगुरूंकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)