उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांना गूगलने डूडलद्वारे वाहिली आदरांजली

मुंबई : शहनाई वादक भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांची आज 102 वी जयंती आहे. यानिमित्त गुगलने आज डूडलद्वारे बिस्मिल्ला खाँ यांना आदरांजली वाहिली आहे.

उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांचा जन्म 21 मार्च 1916 रोजी बिहारमधील डुमरांवमध्ये झाला. कमरुद्दीन हे त्यांचे मूळ नाव आहे. मात्र, पुढे त्यांच्या आजोबांनी ‘बिस्मिल्ला’ म्हणण्यास सुरुवात केली आणि पुढे त्याच नावाने जग त्यांना ओळखू लागले.

वयाच्या 14 व्या वर्षी म्हणजे 1937 साली त्यांनी कोलकात्यातील ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्समध्ये सार्वजनिक व्यासपीठावरुन पहिल्यांदा त्यांनी शहनाईचे वादन केले. त्यानंतर त्यांनी वाद्यसंगीतात स्वत:ला झोकून दिले.

भारतरत्न (2001), पद्मविभूषण (1980), पद्मभूषण (1968), पद्मश्री (1961), संगीत नाटक अकादमी फेलोशिप (1994), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (1956), तानसेन पुरस्कार इत्यादी अनेक मानद पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे. इराण सरकारकडून देण्यात येणाऱ्या ‘तलार मौसिक’ या पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले होते. 21 ऑगस्ट 2006 रोजी कार्डिअॅक अरेस्टने बिस्मिल्ला खाँ यांचा मृत्यू झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)