उसाला एकरकमी 3600 रूपयाची पहिली उचल द्या ! अन्यथा आंदोलन -शिवसेना

कोल्हापूर: आगामी गळीत हंगामातील उसाला एकरकमी 3600 रूपयाची पहिली उचल आणि 4000 रूपयाचा अंतिम दर मिळावा, अन्यथा शिवसेना रस्त्यावरची लढाई करण्यास सज्ज राहील असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे आज येथे दिला.

गडहिंग्लज, आजरा, चंदगड, राधानगरी, भुदरगड व कागल तालुका शिवसेनेतर्फे येथील सूर्या सांस्कृतिक भवनात झालेल्या ऊस परिषदेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. चंदगड मतदारसंघाचे निरीक्षक अशोक निकम व राधानगरी-भुदरगडचे निरीक्षक दिनानाथ चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. या परिषदेत विविध 15 ठराव मंजूर करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विजय देवणे म्हणाले, “”गतवर्षी एफआरपी प्लस 200 रूपये दर ठरला. परंतु, 200 रूपये अद्याप मिळालेच नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी राज्यमंत्री खोत यांच्या ऊस परिषदेला येवून गेले. अनेक घोषणा केल्या. परंतु, फडणवीस यांच्याकडून यात फसवाफसवी झाली तर कोल्हापूरची जनता ती सहन करणार नाही. कोल्हापूरी भाषेतच त्यांना प्रत्युत्तर देतील. खासदार राजू शेट्टींना कोंडीत पकडण्यासाठीच ही ऊस परिषद झाली. खोत यांनी सर्व नियम पायदळी तुडविले आहेत. पिकांना हमीभाव देण्याचा पत्ता नाही. खरेदी-विक्रीत दलाली वाढली आहे. ऊस वजनात काटामारी होते. याकडे सरकारचे लक्षच नाही.””

परिषदेतील ठराव
– पहिली उचल एकरकमी 3600, अंतिम दर 4000 रूपये
– गतवर्षी ठरल्याप्रमाणे 200 रूपये दिलेच पाहिजेत
– रंगराजन समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करा
– दौलत साखर कारखाना सुरू झाला पाहिजे
– दौलतकडून थकीत बिले व कामगार देणी मिळावीत
– साखरेचा हमीभाव 3300 रूपये करावा
– शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी
– संपूर्ण शेतीची वीजबिले माफ करावीत
– जिल्ह्यातील साखर कामगारांची थकीत देणी द्यावीत
– दुष्काळी भागात जलयुक्त कामे करावीत, बॅंक वसूली थांबवावी
– शेतीमाल दीडपट हमीभावाने खरेदी करावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)