उसन्या शंभर रुपयासाठी राणंदमध्ये एकाचा खून

गोंदवले, दि. 28 (वार्ताहर) – राणंद, ता. माणमध्ये रात्री उसन्या पैशातून झालेल्या वादावादीचे रुपांतर मारामारीत झाले. यामध्ये डोक्‍यात काठी लागून एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी दहिवडी पोलिसांनी मंगळवारी एकास अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी, विठ्ठल सावंत याने सचिन सावंत (वय 38) यांच्या वडिलांकडून काही दिवसांपूर्वी शंभर रुपये हात उसने घेतले होते. दि. 26 रोजी ते मागितले असता संशयीताने तुझ्या मुला मी दोनशे रुपये दिले ते आधी दे असे सांगितले. यावरून त्यांच्यात वादावादी झाली.
यानंतर संशयीत विठ्ठल सावंत याने सचिन यांच्या घरी जाऊन माझे पैसे माघारी दे यावरून वाद घातला. यावेळी सचिनचे वडीलही तेथे आले. त्यांनी मुलाला मारू नको असे सांगितले. परंतु, वादावादीनंतर संशयीताने सचिन यांच्या डोक्‍यात काठी मारली. यामुळे डोक्‍यातून रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यु झाला. संशयीतास सपोनि प्रवीण पाटील यांनी अटक केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)