पुणे – हात उसने घेतलेले पैसे दिले नाहीत म्हणून एका महिलेच्या तरुण मुलाला उचलून नेण्यात आले. यानंतर त्यास मारहाण करुन पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे.

फिर्यादी 36 वर्षीय महिलेने ओळखीच्या एका महिलेकडून 50 हजार उसने घेतले होते. हे पैसे व्याजासकट दिले नाहीत म्हणून तिच्या 18 वर्षाच्या मुलाला दोघांनी घरातून जबरदस्तीने उचलून नेले. त्याला मोहननगर येथील मोकळ्या मैदानात नेऊन हाताने व पट्ट्याने मारहाण करण्यात आली. यानंतर फिर्यादीला फोन लावून पैसे न दिल्यास मुलास जीवे ठार मारू, अशी धमकी देण्यात आली. दरम्यान पोलिसांना याची खबर मिळाल्यावर आरोपी मुलाला मैदानावरच सोडून पळून गेले. उसने घेतलेले पैसे दिले असून व्याजाच्या पैशाची मागणी करून हा प्रकार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सी. एम. मोरे तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)