उष्माघात रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजना

मागील वर्षी 13 बळी: यंदा खबरदारी घेण्याचे आवाहन
पुणे – राज्याच्या आरोग्य विभागाने यंदाच्या उन्हाळी दिवसांची तयारी आतापासूनच करण्यास सुरुवात केली असून उष्माघाताचे बळी जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस अधिकच समोर येत आहे. खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीकोनातून आतापासूनच आरोग्य विभागाकडून कार्यवाही सुरु केली आहे. मागील वर्षात उन्हामुळे त्रास झाल्याच्या 313 घटनांची नोंद झाल्याचे समोर आले आहे.

उन्हामुळे होणाऱ्या या त्रासापासून वेळीच सावध व्हा
– उन्हामुळे त्त्वचेला लाल पुरळे येणे, उन्हात गेल्यावर डोके दुखणे, ताप येणे
– उन्हामुळे चमका येणे, शक्‍यतो पायात पोटाच्या खाली चमका येणे
– प्रचंड घाम येणे, थकवा जाणवणे, उलटी आल्यासारखे होणे
– धडधड वाढणे, उन्हाने चक्‍कर येणे, त्त्वचा कोरडी पडून अजिबातच घाम न येणे

उन्हाचा त्रास झाल्यास प्रथमोचार
– थंड पाण्याने अंघोळ करणे, कोरडे व सैल कपडे घालणे.
– चमका येत असल्यास सावलीत जाऊन शरीराला योग्य पध्दतीने मसाज करणे
– थकवा जाणवल्यास सावलीत जाऊन आराम करावा व लगेचच वैद्यकीय सल्ला घ्यावा
– उन्हाने चक्‍कर आल्यास लगेचच दवाखान्यात जावे. चक्‍कर येण्याकडे जराही दुर्लक्ष करु नये

आरोग्य विभागाकडून राज्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचे सध्या प्रशिक्षण वर्ग घेण्यात येत असून त्यांना उन्हापासून वाचण्यासाठी काय करावे, कसे करावे, कोणत्या खबरदारी घ्याव्यात याबाबतचे प्रशिक्षण दिले जात आहे. जेणे करुन हे अधिकारी याबाबत उन्हाळा सुरु झाल्यानंतर याबाबत जनजागृती करतील.
याबाबत राज्य आरोग्य विभागाचे साथ रोग अधिकारी डॉ. जितेंद्र डोलारे म्हणाले, मागील वर्षी राज्यभरातून 313 केसेसची नोंद झालेली त्यातील 7 जणांचा उष्माघाताने बळी गेला आहे तर 6 जणांचा उष्माघातानेच बळी गेला आहे असा संशय आहे. या घटना मार्च एप्रिल व मे महिन्याच्या दरम्यान घडल्या आहेत. यामध्ये मार्च महिन्यात सर्वाधिक म्हणजेच 7 बळी गेले होते तर एप्रिल व मे महिन्यात प्रत्येकी तीन बळी गेले होते. उन्हाचा त्रास झालेल्या 313 केसेसमध्ये भंडारा येथे सर्वाधिक 82 जणांना याचा त्रास झाला आहे. तर त्या पाठोपाठ गडचिरोली 42, अकोला 37, नांदेड 30, नागपूर 28 या जिल्ह्यांचा समावेश आहे. या वर्षी आतापर्यत राज्यातून एकही उष्माघाताच्या बळीची नोंद नाही. मात्र आता जसा जसा उन्हाचा पारा वाढेल तसे याबाबत नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच सध्या आम्ही अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
2 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)