उष्माघाताला या उपायांनी ठेवा दूर

उन्हाळा सुरू असल्याने ऊन वाढतच चालले आहे. उष्माघाताचा त्रास होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. उन्हाळ्यात डिहायड्रेशन झाल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. यामुळे या दिवसात चांगल्या आरोग्यासाठी डॉक्‍टरांनी दिलेल्या पुढील टिप्स अवश्‍य फॉलो करा…

उष्माघाताची लक्षणे

थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भुक न लागणे, चक्‍कर येणे, निरुत्साही होणे, दुखणे, पोट-यांत वेदना येणे अथवा पेंडके येणे, रक्‍तदाब वाढणे, मानसिक बैचेन व अस्वस्थता, बेशुश्‍ध्दवस्था इत्यादी

प्रतिबंधक उपाय

वाढत्या तापमानांत फार वेळ कष्टाची काम करणे टाळणे, प्रत्येक तासा दीड तासानंतर अर्धातास सावलीत विश्रांती घ्यावी. काष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असतांना करावीत. उष्णता शोषून घेणारे कपडे ( काळया किंवा भडक ) रंगाचे वापरु नयेत. सैल पांढ-या टेरीलीन, लोकरी पासून बनवलेले नसावेत दिवसभरात भरपूर पाणी प्यावे. सरबत घ्यावे, अधुनमधून उन्हामध्ये काम करणे टाळावे व सावलीत विश्रांती घ्यावी. वरील लक्षणे सुरु होताच ताबडतोब उन्हांत काम थांबवावे व उपचार सुरु करावा उन्हांत बाहेर जाताना गॉगल्स डोक्‍यावर टोपी टॉवेल फेटा उपकरणे यांचा वापर करावा.

उपचार

उष्माघात झालेल्या रुग्णांस हवेशीर खोलीत ठेवणे, खोलीत पंखे कुलर ठेवावेत, वातानुकुलीत खोलीत ठेवावे. रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, रुग्णांस बर्फाच्या पाण्याचे अंघोळ घालावी रुग्णाच्या संपूर्ण शरीरावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवायांत व त्या गरम झाल्यावर पुन्हा थंड पाण्यांत बूडवून वापराव्यांत उन्हाचा त्रास होत असल्यास तुम्ही हे प्राथमिक उपाय करू शकता. तसेच उष्माघात झाल्यास तातडीने रुग्णाला त्वरीत रुग्णालयात घेऊन जा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)