उष्माघातापासून जपण्यासाठी वेळीच घ्या काळजी

गेल्या वर्षी गेले होते 7 बळी : तापमान उच्चांक गाठण्याची चिन्हे

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मागील वर्षी उष्माघातामुळे राज्यभरात बळी जाण्याचे प्रमाण 7 होते. तर उन्हामुळे त्रास झालेल्यांची संख्या 313 होती. यंदाही तापमान उच्चांक गाठण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच उन्हापासून आपली तब्बेत सांभाळणे गरजेचे आहे.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार यंदा आतापर्यंत उष्माघाताचा एकही बळी नाही. मात्र, ही आकडेवारी शून्य राहण्याच्या दृष्टीकोनातून आपण प्रत्येकानेच उन्हाच्या या तडाख्यापासून सावध रहाणे गरजेचे आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून उन्हाळ्यात काय करावे तसेच काय करु नये, याची माहिती देण्यात आली आहे. तसेच उन्हामुळे नेमके कोणते त्रास होतात व त्याचा वेळीच कसा सामना करावा याचीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. अनेकांचे काम हे दुपारच्या कडक उन्हातही फिरतीचे असते. अशा वेळी त्यांनी नेमक्‍या कोणत्या प्रकारची खबरदारी घ्यावी, याचीही माहिती आरोग्य विभागाने जाहीर केली आहे.

अशी घ्या काळजी
– दुपारी 12 ते 3 च्या उन्हात जाणे शक्‍यतो टाळावे.
– जीन्स व नेटेडचे कपड्यांपेक्षा सुती व फिक्‍या रंगाचे कपडे वापरावे
– उन्हात छत्री, टोपी, मोजे, सनकोट यांचा वापर करा.
– शक्‍य असल्यास दिवसातून दोन वेळा आंघोळ करा.

उन्हाळ्यात आहार जपा
– तहान लागलेली नसली, तरीही पुरेसे पाणी प्यावे.
– चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक ही पेय टाळा
– जास्त प्रथिने (प्रोटीन) असणारे व शिळे अन्नपदार्थ खाणे टाळा
– घरगुती ताक, लिंबू सरबत, शिजवल्या जाणाऱ्या भाताचे पाणी अशी पेय प्या

तातडीने घ्या सल्ला
उन्हामुळे डोक्‍यात चमका येणे, डोके दुखणे, अशक्‍तपणा वाटणे, प्रचंड घाम येणे, चक्‍कर येणे असे प्रकार झाल्यास त्वरीत वैद्यकीय सल्ला घ्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)