उर्से टोलनाका येथे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग रोखल्याप्रकरणी दीडशे आंदोलकांवर गुन्हे दाखल

सोमाटणे – उर्से टोलनाका येथे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग रोखून धरणाऱ्या आंदोलकांवर तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले. उर्से टोल नाक्‍यावर दोन्ही दिशेचा मार्ग तब्बल सहा तास रोखला होता.

या प्रकरणी अनोळखी 150 ते 175 आंदोलकांवर कारवाई होणार आहे. रस्ता अडवणे, जमाव जमवणे तसेच नव्यानेच लागू झालेला हायवे ऍक्‍ट 8 ब नुसार तळेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सकल मराठा क्रांती मोर्चाकडून गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास द्रुतगती मार्ग रोखला गेला होता. टाळ-मृदुंगाचा गजर करत, भजन-कीर्तनातून सरकारचा निषेध केला. उर्से, आढे, बऊर, ओझर्डे, धामणे, सोमाटणे, तळेगाव दाभाडे, देहुरोडसह परिसरातील गावामधून आंदोलनकर्ते जमा झाले होते. ही रास्ता रोकोची सुरुवात झाली होती. हे आंदोलन पहिल्या अर्ध्या तासात संपले. मग असेच टप्याटप्याने आंदोलकांची ये-जा सुरूच होती.

तब्बल 700 ते 800 जमाव तोपर्यंत निदर्शने नोंदवून निघून गेला होता. मात्र शेवटचा 150 ते 175 व्यक्‍तींचा जमाव रस्त्यावरून हटण्यास तयार नव्हता. यापैकी आंदोलनकर्ते दोन वेगवेगळ्या गटांत विभागून बेकायदेशीर जमाव जमवून मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीकरिता “एक मराठा लाख मराठा’ आशा घोषणा देत राहिले व द्रुतगती मार्गावर पुणे व मुंबईच्या दिशेने जमाव करून महामार्ग रोखून धरत मुंबईकडे व पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना मज्जाव केला. पोलिसांकडून वारंवार आवाहन केले जात होते. त्यानंतर हा जमाव साडेचारला बाजूला झाला. तोपर्यंत दोन्ही दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शेकडो प्रवासी अडकून पडले होते. तब्बल सहा तासाने या सर्वांची सुटका झाली. त्यामुळे पोलिसांनी शेवटच्या 150 ते 175 च्या जमावावर गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)