उर्वशीवर 80 किलोच्या ड्रेसमुळे बेशुद्ध पडण्याची वेळ!

अनेक बॉलिवूड सुंदरींनी बॅंकॉकमध्ये रंगलेल्या आयफा अवार्डस 2018मध्ये ग्रीन कार्पेटवर आपला जलवा दाखवला. एक अभिनेत्री यात अशीही होती, लोकांच्या नजरा जिच्या ड्रेसवरून हटत नव्हत्या. अभिनेत्री उर्वशी रौतेला या सोहळ्यात एकदम हटके लूकमध्ये दिसली. ती तिच्या लाईट पिंक कलरच्या गाऊनमुळे चांगलाच भाव खावून गेली. पण उर्वशीच्या हा गाऊन सांभाळता सांभाळता नाकीनऊ आले. त्याचबरोबर बेशुद्ध पडण्यापर्यंत स्थिती तिच्यावर ओढवली. उर्वशीने या सोहळ्यात घातलेला गाऊन तब्बल 80 किलोंचा होता. हा 80 किलोंचा गाऊन अंगावर वाहून नेताना उर्वशीची काय अवस्था झाली असणार, याचा अंदाज तुम्ही बांधू शकता.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हा गाऊन घालून उर्वशी दिमाखात ग्रीन कार्पेटवर आली खरी पण तिला धड चालताही येत नव्हते. तिची पाऊले गाऊनच्या वजनामुळे अडखळायला लागली. आपण बेशुद्ध पडू, असे तिला एका क्षणाला वाटू लागले. उर्वशीने हा ड्रेस घालून चालतांनाचा एक व्हिडिओ सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. उर्वशी या व्हिडिओत कमालीची सुंदर दिसत आहे.
पण या व्हिडिओत उर्वशीची ड्रेस सांभाळताना किती दमछाक झाली, तेही स्पष्ट दिसत आहे. उर्वशीचा हा ड्रेस बॉलिवूडची सेलिब्रिटी फॅशन डिझाईनर अर्चना कोचर हिने डिझाईन केला होता.

उर्वशी इन्स्टाग्रामवर नेहमीच ऍक्‍टिव्ह असते. तिच्या पोस्ट, फोटो आणि व्हिडीओमुळे तिला आतापर्यंत 80 लाख फॉलोअर्स मिळाले आहेत. तिच्या पोस्टना लाईक मिळण्याचे प्रमाणही खूप जास्त आहे. “हेट स्टोरी 4’नंतर तिच्या लोकप्रियतेमध्ये खूपच वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी तिला अंदमान आणि निकोबार सरकारकडून “यंगेस्ट मोस्ट ब्युटीफुल वुमन इन युनिव्हर्स 2018′ या पुरस्काराने गौरवले गेले होते. राज्याच्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार तिला दिला गेला होता. आपल्या लोकप्रियतेचे श्रेय ती आपल्या फॅन्सलाच देते आहे. त्यांच्यामुळेच प्रेरणा मिळत राहिल्याने आपण फिट राहिल्याचे तिने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)