उर्मिला मराठी सिनेमाच्या निर्मितीमध्ये

उर्मिला मातोंडकर हे नाव बॉलीवूडमधील आघाडीच्या नायिकांमध्ये घेतले जाते आहे. अन्य अभिनेत्रींप्रमाणे उर्मिलानेही लग्नानंतर अगदी निवडक रोल स्वीकारले होते. या वर्षाच्या सुरुवातीला तिने अभिनय देवच्या “ब्लॅकमेल’मध्ये एका गाण्यापुरता परफॉर्मन्स दिला होता. यामध्ये इरफान खान आणि किर्ती कुल्हारी हे लीड रोलमध्ये होते.

“रंगीला गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणात्या उर्मिलाने ‘झाकोळ’ या चित्रपटातून मराठीत पदार्पण केले होते. त्यानंतर तिने सुजय डहाकेच्या ‘आजोबा’ या मराठी सिनेमात दमदार भूमिका साकारली होती. माधुरी दीक्षित पाठोपाठ आता
आता पतीदेव मोहसीन अख्तरबरोबर ती निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करते आहे. उर्मिलाने मराठी सिनेमाच्या निर्मितीत पाऊल टाकले आहे. उर्मिलाच्या ‘माधुरी’ या चित्रपटाची पहिली झलक आता प्रसिध्द झाली आहे. यात दिसणारी माधुरी कोण आहे याचा उलगडा झालेला नाही. मात्र मराठीत एका सुंदर ‘माधुरी’ची या सिनेमातून एन्ट्री होणार आहे.

-Ads-

तिने या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढवणारा एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये तिने मराठीतील नव्या “माधुरी’ला ओळखा असे आवाहन केले होते. आता माधुरीची पहिली झलक रिलीज झाली आहे. त्यामुळे तुम्ही ती कोण आहे हे व्हिडिओ पाहून ओळखा. विशेष म्हणजे माधुरी चित्रपटाच्या शीर्षकामध्ये ‘वय विचारु नका’ असे मजेशीर कॅप्शन दिले आहे. त्यामुळे ट्रेलरची उत्सुकता वाढली आहे. ‘माधुरी’ हा स्वप्ना वाघमारे जोशी यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा 30 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

काही दिवसांपूर्वीच माधुरी दीक्षितनेही “बकेट लीस्ट’ या मराठी सिनेमाची निर्मिती केली होती. त्यापूर्वी प्रियांका चोप्राने “व्हेंटिलेटर’ची निर्मिती केली तर जॉन अब्राहम आणि अजय देवगण यांनीही मराठी सिनेमाच्या निर्मितीमध्ये आपले पदार्पण केलेले आहे. आता त्यांच्या रांगेमध्ये उर्मिलाही जाऊन बसणार आहे. उर्मिलाबाबतची आणखी एक खास बात म्हणजे तिच्या “भूत’मधील “भूत हूं मै’ या गाण्याचे नवीन व्हर्जन “लुप्त’ या आगामी हॉररपटामध्ये असेल. तर “चायना गेट’मध्ये उर्मिलाने साकारलेल्या “छम्मा छम्मा’चे रिक्रिएशन अर्शद वारसीच्या “फ्रॉड सैंय्या’मध्ये असणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)