उर्ध्व प्रवरा प्रकल्पांतर्गंत कॅनलच्या कामाला मंजुरी

नवी दिल्ली – अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्‍यात निलवंडे धरणावरील उर्ध्व प्रवरा प्रकल्पांतर्गत कॅनलच्या कामाला केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी दिली.

लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान लोखंडे यांनी उर्ध्व प्रवरा प्रकल्पावरील कॅनल उभारण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. गेल्या 47 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पासाठी एकूण 2223 कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत अकोले तालुक्‍यातील कॅनलच्या 28 कि.मी.च्या कामासाठी राज्य शासनाने जमीन अधिग्रहीत केली आहे. कॅनलच्या कामासाठी केवळ 350 कोटी खर्च अपेक्षित असून याच ठिकाणी बंद पाईपलाईनद्वारे पाणी नेल्यास 980 कोटींचा खर्च येणार आहे. त्यामुळे जमीन अधिग्रहण झाले असल्याने कॅनलचेच काम पूर्ण करून शेतीला पाणी पुरवठा करण्याची मागणी लोखंडे यांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या प्रश्नाच्या उत्तरात गडकरी यांनी ही मागणी मान्य करत या भागातील शेतीला कॅनलद्वारे पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घोषित केला. एक वर्षात शेतक-यांना पाणी उपलब्ध करून दिल्या जाईल, असे आश्वासन दिल्याचे लोखंडे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)