उर्दू शाळेत शिक्षकांच्या 43 जागा रिक्‍त

पिंपरी – शहरातील महापालिकेच्या उर्दू शाळेत शिक्षकांची कमतरता जाणवत आहे. यामुळे, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून शिक्षकांनाही अतिरिक्त विद्यार्थ्यांना शिकविताना कसरत करावी लागत आहे. तसेच, शिक्षकांच्या तब्बल 43 जागा रिक्‍त असल्याने इतर वर्ग एकत्रित करुन शिकवावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरात महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या 14 प्राथमिक शाळा असून विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या तुलनेत शासनमान्य 131 शिक्षकांची गरज असताना केवळ 88 शिक्षक उपलब्ध असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

मागील काही वर्षात महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. परंतु, कालांतराने या शाळांचा “स्मार्ट सिटी’मध्ये समावेश झाल्याने विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करुन शिक्षण दिले जाऊ लागले. यामुळे, शाळा हायटेक होऊ लागल्याने महापालिका शाळांची पटसंख्या वाढू लागली. परंतु, सध्या उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या जास्त तर शिक्षक कमी अशी परिस्थिती झाली आहे. शालेय स्तरावर पहिली ते पाचवीपर्यत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत होण्यासाठी चांगले शिक्षण मिळणे आवश्‍यक असते. परंतु, उर्दू माध्यमातील शाळांमध्ये शिक्षक संख्या कमी असल्याने गुणवत्तेचा प्रश्‍न उभा राहिला आहे. सद्यस्थितीत उर्दू माध्यमातील शाळांकडे दुर्लक्ष झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरातील खासगी शाळांच्या तुलनेत महापालिकेच्या शाळा सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाळांची पटसंख्या वाढण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सुविधा पुरविल्या जात आहेत. महापालिकेच्या उर्दू माध्यमातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपण्यासाठी अवघे काही महिने शिल्लक असूनही अभ्यासक्रम पाहिजे तेवढा पूर्ण झालेला नाही. या शाळांमधील तीन ते चार वर्ग एकत्रित करुन शिकविण्याची वेळ शिक्षकांवर आलेली आहे. पुणे महापालिकेने उर्दू शाळेतील शिक्षकांची नुकतीच भरती काढलेली आहे. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने भरती काढणे गरजेचे आहे. यापूर्वी, उर्दू शाळांमध्ये शिक्षकांची शेवटची भरती 2013 साली केली होती.

महापालिकेच्या इतर माध्यमांप्रमाणे उर्दू माध्यमात शिक्षकांची भरती करणे आवश्‍यक आहे. तसेच, शिक्षकांचा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी उर्दू शाळेतील शिक्षकांसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे.
– प्रा. सोनाली गव्हाणे, सभापती, शिक्षण समिती महापालिका.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)