उर्दू लेखिका इस्मत आपा यांना गुगलची डूडलद्वारे आदरांजली

नवी दिल्ली – प्रसिद्ध उर्दू लेखिका इस्मत चुगताई यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त गुगलने एक खास डूडल साकारत त्यांना आदरांजली दिली आहे. यामध्ये इस्मत चुगताई विचारात मग्न असलेल्या दिसत असून  लिहिताना दिसत आहेत. इस्मत चुगताई यांना इस्मत आपा या नावानेही ओळखले जात होते. त्यांनी महिलाप्रश्न आधुनिक पद्धतीने उचलून धरला होता. इस्मत आपा यांनी मध्यम वर्गातील मुस्लीम समाजातील तरुण मुलींच्या मनात चालणाऱ्या भावनांना उर्दू कथेद्वारे मांडले होते.

इस्मत आपा यांचा जन्म २१ ऑगस्ट १९१५ रोजी उत्तरप्रदेशमधील बदायू या ठिकाणी झाला. दहा भाऊ-बहिणींमध्ये इस्मत आपा नवव्या होत्या. इस्मत आपाची पहिली कथा ‘गेंन्दा’ १९४९ रोजी तर कादंबरी ‘जिद्दी’ १९४१ साली प्रकाशित झाले. इस्मत आपाला खरी ओळख मिळाली ती ‘लिहाफ’ य लघुकथेमुळे. परंतु ही कथा त्यांची चांगलीच वादात सापडली. याविरुद्ध त्यांच्यावर न्यायालयात खटला सुरु झाला होता.

-Ads-

इस्मत आपा या चित्रपटासाठी स्क्रिप्टही लिहित होत्या. १९४३ साली ‘छेडछाड’ या चित्रपटासाठी त्यांनी पहिली स्क्रिप्ट लिहली. याशिवाय जिद्दी, आरजू, फैराब या चित्रपटासाठी स्क्रिप्ट लिहल्या. यानंतर इस्मत आपा यांनी आपल्या पतीसोबत ‘फिल्मिना’ प्रोडक्शन कंपनी काढून ‘सोने कि चिडिया’ हा चित्रपट निर्माण केला. त्यांचा शेवटचा चित्रपट ‘गरम हवा’ १९७३ रोजी प्रदर्शित झाला.

इस्मत आपा यांच्या कथा वास्तविकतेचा अनुभव द्यायच्या. १९७६ रोजी भारत सरकारने इस्मत आपा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. २४ ऑक्टोबर १९९१ रोजी त्यांचे निधन झाले. ‘कागजी है पैरहन’ या नावाने इस्मत आपा यांची आत्मकथा प्रकशित झाली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)