मुंबई – शासकीय इमारती उर्जा कार्यक्षम प्रकल्प राबविण्यात येत असून नागपूर येथील विधानभवन, राजभवन, आमदार निवास, रवी भवन, हैद्राबाद हाऊस, पुणे येथील राजभवन, सेट्रल बिल्डींग, औंध येथील जिल्हा रुग्णालय, सोलापूर जिल्हा रुग्णालय, मुंबई मुलुंड येथील राज्य कामगार विमा रुग्णालय, बांधकाम भवन, जीटी रुग्णालय, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आणि औरंगाबाद उच्च न्यायालय या इमारती या प्रकल्पांतर्गत पूर्ण झाल्या आहेत.
या प्रकल्पामुळे 8.55 लाख युनिट वीजेची बचत होत असून त्यामुळे 98 लाख रुपयांची बचत झाली आहे. या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत 2 लाख 11 हजार 615 ट्युब लाईट, 71 हजार 327 पंखे, 1 हजार 670 वातानुकुलीत यंत्रे बदण्यात आली आहेत. दिवसाला साधारणत: 5 लाख 65 हजार रुपयांची बचत होत असल्याचे सादरीकरणा दरम्यान सांगण्यात आले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा