उरूळी कांचनच्या बाजारात शेतकऱ्यांची गर्दी

उरूळी कांचन- उरुळी कांचन परिसरात मंगळवारी (दि. 9) भाद्रपदी बैलपोळा असल्याने रविवारी (दि.7) यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजारात एकच गर्दी केली होती. हवेली आणि दौंड तालुक्‍यात शेती बैलाच्या साहाय्याने केली जाते.
उरुळी कांचन येथे दर रविवारी आठवडे बाजारात भरतो. या बाजारात हवेली-दौंड तसेच पुरंदर तालुक्‍यातील शेतकरी खरेदी करण्यासाठी येतात. मंगळवारी आमवस्या असल्याने त्या दिवशी बैलपोळा असल्याने उरुळी कांचन येथील आठवडे बाजारात आज बैल पोळयासाठी लागणारे साहित्य, गुंगर माळा, बेगाड, बाशिंगे, मोरखी, मुसकी, झुली, फुलांच्या माळा, फुगेसह साहित्य खरेदी करण्यासाठी बैलमालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
याबाबत नानासाहेब भुजबळ यांनी सांगितले, यंदा पाऊस कमी पडला असून अजून ही काही ठिकाणी पेरणी झालेली नाही. तरीपण शेतकरी वर्षातून एकदाच बैलाचा सण येत असल्याने रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बैलाच्या साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)