उरूळीदेवाची येथील घरात चोरी

लोणी काळभोर – उरुळी देवाची (ता. हवेली ) येथील घराच्या बेडरूमच्या खिडकीचे लोखंडी ग्रील वाकवून, त्याद्वारे घरात प्रवेश करून चोरट्यांनी रोख नऊ हजार रुपयांसह सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण 58,400 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
लोणी काळभोर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, या संदर्भात बाबासाहेब लक्ष्मण गुजर (वय 39, रा. धनगर वस्ती, उरुळी देवाची, ता. हवेली) यांनी फिर्याद दाखल केली आहे. ही घटना रविवारी (दि. 7) दहा ते सोमवारी (दि. 8) पहाटे साडे पाच वाजण्याच्या दरम्यान घडली. रविवारी रात्री फिर्यादी व त्यांचे कुटुंबिय घराच्या हॉलमध्ये झोपले होते. पहाटे साडे पाच वाजता ते झोपेतून उठले व बेडरूममध्ये जाण्यास निघाले. त्यावेळी बेडरूमच्या दरवाजाची कडी आतून कुणीतरी लावलेली होती. त्यांनी घराच्या पाठीमागे जाऊन पाहिले असता बेडरूमच्या खिडकीचे लोखंडी ग्रील कुणीतरी वाकवलेले दिसले. बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता आतील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाट तपासून पाहिले असता त्यातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम गायब झालेली दिसली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)