उरुळी देवाची येथून दोन पिक-अप वाहनांची चोरी

लोणी काळभोर- ऊरुळी देवाची ( ता. हवेली ) गावच्या हद्दीतून अज्ञात चोरट्यांनी रात्री अंधाराचा फायदा घेऊन 6 लाख 50 हजार रुपये किमतीची दोन महिंद्रा पिकअप वाहने चोरून नेली असल्याची घटना आज (दि. 29) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.
या प्रकरणी मल्हारी महादेव शिंदे (वय 39, रा. हंडेवाडी, ता. हवेली ) यांनी फिर्याद दिली आहे. शिंदे हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी आपला सेंटरिंग माल वाहतूक करण्यासाठी पिकअप (क्र. एमएच 12 एलटी 8588) घेतली असून त्यावर चालक म्हणून विश्वनाथ रामचंद्र गरूड (मूळ रा. पिंगळी, ता. जि. परभणी, सध्या रा. मंतरवाडी, ऊरुळी देवाची, ता. हवेली) काम करतात.
सोमवारी (दि. 28) रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास गरूड कामावरून घरी आले. त्यांनी गाडी ते राहत असलेल्या बिल्डिंगच्या मोकळ्या जागेत लावली होती. आज (दि. 29) रोजी रात्री दीडच्या सुमारास ते उठले तेव्हा गाडी लावलेल्या ठिकाणी होती. पुन्हा पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ते उठले मात्र, यावेळी गाडी न दिसल्यामुळे त्यांनी तात्काळ मालक मल्हारी शिंदे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना हकीकत सांगितली. शिंदे यांनी त्या ठिकाणी जाऊन गाडीचा शोध घेतला; परंतु गाडी मिळाली नाही. त्यांच्या गाडीपासून पन्नास फूट अंतरावर दत्तात्रय देवराम भाडळे यांची पिकअप (क्र. एमएच 12 एलटी 6713) लावलेली होती. भाडळे यांनीही या गाडीचा शोध घेतला; पण ही गाडी देखील परिसरात सापडली नाही. त्याचा शोध घेत होते. त्यामुळे दोन्ही पिकअप चोरी झाल्याची खात्री पटल्यानंतर शिंदे यांनी ऊरुळी देवाची दूरक्षेत्रात जाऊन अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)