उरुळी कांचन येथे उपसरपंचपदासाठी आज निवडणूक

उरुळी कांचन- येथील उपसरपंच सुनील कांचन यांनी जून महिन्यात राजीनामा दिल्यानंतर सरपंच अश्विनी कांचन यांनी तो मंजूर केला होता. त्यामुळे अनेक महिन्यांपासून उरुळी कांचन (ता. हवेली) गावला उपसरपंच नसल्यामुळे त्यानुसार उपसरपंचपदाची निवडणूक शुक्रवारी (दि. 14) होणार आहे.
सरपंच अश्विनी कांचन यांच्यावर त्यांच्या मनमानी कारभारामुळे 7 जुलै रोजी अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. यावेळी सरपंच अश्विनी कांचन यांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे अपील केले होते. नोटीस न मिळाल्याने हा मुद्दा अवैध ठरविला. त्यामुळे पुन्हा अश्विनी कांचन याच सरपंच होणार असा जिल्हा अधिकाऱ्यांनी आदेश काढला होता. आता सोमवारी (दि. 10) सरपंच अश्विनी कांचन यांच्यावर पुन्हा अविश्वास ठराव दाखल केल्यामुळे पुन्हा सरपंचपदाची निवडणूक शनिवारी (दि. 15) होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)