उरुळी कांचन परिसरात डॉ. बाबासाहेब जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

उरुळी कांचन- उरुळी कांचन, सोरतापवाडी, नायगाव, शिंदवणे आदी भागांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उरुळी कांचन येथील सटवाई चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पूजा पुणे जिल्हा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अजिंक्‍य कांचन आणि उरुळी कांचन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले, सरपंच अश्विनी कांचन, ग्रामविकास अधिकारी कैलास कोळी यांच्या हस्ते पुतळयाची पुजा करण्यात आली
हवेली तालुका भाजपचे अध्यक्ष रोहिदास उंदरे, शहर अध्यक्ष श्रीकांत कांचन, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विकास जगताप, डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेचे संचालक भाऊसाहेब कांचन, ग्रामपंचायत सदस्य सागर कांचन, सुनील कांचन, सदस्या सारिका लोणारी, पोलीस सचिन पवार, सोमनाथ चित्तारे, शिरीष कामठे, सुनील तांबे, संजय बडेकर, भाजपचे युवा नेते प्रवीण काळभोर यांसह मान्यवर उपस्थित होते. उरुळी कांचन येथील ग्रामपंचायत कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कुंजीरवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख स्वप्निल कुंजीर यांनी प्रतिमेचे पूजन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांच्या माहितीविषयी पुस्तकाचे वाटप केले. या वेळी संतोष कुंजीर, बापुसाहेब लाड, विशाल शेलार, रामभाऊ तुपे, संदीप कांचन यांसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवसेनेचे विभाग प्रमुख स्वप्निल कुंजीर म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर यांनी 18-18 तास अभ्यास केला. सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी भारतीय घटना लिहिली. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तरुण पिढी त्याप्रमाणे शिक्षण घेऊन समाज घडवावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)