उरुळी कांचन- उरुळी कांचन (ता. हवेली) येथील परिसरात डेंग्यू आणि स्वाईन फ्ल्यू वाढल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी आज्ञा ज्ञानेश्वर गोते (वय 15) या मुलीचा मृत्यू झाला होता. आता तुपे वस्तीवरील एका महिलेला स्वाईन फ्ल्यू झाला आहे.
उरुळी कांचन परिसरात मोठ्या प्रमाणात गटार लाइन उघड्यावर आहेत, तर बरेच ठिकाणी या लाइन तुंबल्या आहेत. त्यामुळे या परिसरात साथीचे आजारा मोठ्या प्रमाणात वाढले असून, डेंग्यू आणि स्वाइन फ्ल्यूचा फैलाव होत आहे. आज्ञा ज्ञानेश्वर गोते ही विद्यार्थिनी 10 मध्ये 92 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली होती. तिला डेंग्यू झाला. त्यानंतर उपचारासाठी पुणे येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. आता तुपे वस्तीवरील एका महिलेला स्वाईन फ्ल्यू झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

  • ग्रामपंचायतीमार्फत आम्ही आठवड्यातून एक दिवस नियमितपणे कोरडा पाळत आहे, तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात औषध फवारणी सुरू केली आहे. दररोज एका वॉर्डात ही फवारणी होत आहे.
    – कैलास कोळी, ग्रामविकास अधिकारी, उरुळी कांचन
  • प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांना काही त्रास होत असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.
    – डॉ. सुचिता कदम, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)