उरुळी कांचन चौकात अपघातात दोन मृत्यमुखी

उरुळी कांचन – पुणे-सोलापूर महामार्ग उरुळी कांचन येथील पेट्रोल पंपासमोर दुचाकी वाहनाला एक अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बुधवारी (दि. 28) रात्री झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उरुळी कांचन येथील दत्तात्रय दशरथ जाधव (वय 28, रा. डाळिंब, तालुका दौंड) आणि हरि गोविंद कांबळे (वय 27, रा चिखली तालुका मुखेड जिल्हा नांदेड), विष्णू बन्सीजी गजरवाल (वय 26, रा. माळणी, तालुका मुळखेड, जि. नांदेड) आणि दत्तात्रय संग्राम वाघमारे (वय 25, रा. केदारकुंडा, तालुका देगलुर, जिल्हा नांदेड) हे चौघेही एकाच दुचाकीवरून (क्र. एमएच 12, जी डब्ल्यू 0979) जात होते. यवतवरून पुण्याकडे जाणाऱ्या या वाहनाला उरुळी कांचन येथील चौकात पेट्रोल पंपावर वळत असताना पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील चौघांपैकी दत्तात्रय जाधव आणि हरि कांबळे हे दोन जागीत मृत झाले, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात वाहन फरार झाले. हा अपघात बुधवारी (दि. 28) रात्री 1 च्या सुमारास झाला. अपघाताची माहिती मिळताच कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे तसेच रुग्णवाहिकेचे चालक हे घटनास्थळी दाखल झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)