उरुळी कांचनमध्ये प्लॅस्टिकचे पुन्हा दर्शन

परिसरातील ग्रामपंचायतीकडून कारवाई, प्रबोधनाला बगल

उरुळी कांचन- उरुळी कांचन, सोरतापवाडी, कुंजीरवाडी, यवत परिसरात प्लॅस्टीक बंदी केवळ कागदावरच राहिली आहे. बहुतेक सर्व गावांत सध्या सर्रास प्लॅस्टीकच्या पिशव्यांचा वापर होत आहे. यावर कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामविकास अधिकारी यांची आहे. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. परिसरातील अनेक तरुणांनी स्वच्छता मोहीमाव्दारे जागृती केली. मात्र, पुन्हा बाजारात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशवींचा सुळसुळाट दिसून येत आहे.
पर्यावरणाला नुकसान पोहचविणाऱ्या हानीकारक प्लॅस्टीकच्या वापरावर राज्य शासनाने बंदी घातली आहे. त्यानंतर सर्वत्र छापेमारी झाली. परंतु गुटखाबंदी कायद्याप्रमाणे याचाही फज्जा उडाला आहे. सध्या सर्वत्र पिशव्यांचा वापर राजरोसपणे सुरु आहे. सुरुवातीला बेगडी कारवाई करून आपली पाठ थोपटून घेतली. परंतु आता याकडे कानाडोळा केला जात आहे. पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद यांच्या बैठकीत गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी हे फक्‍त कागदी घोडे नाचवून थांबतात.त्यामुळे कचराभूमी झाली आहे.
प्लॅस्टीकचा वापर प्रामुख्याने भाजी व फळ, मटण विक्रते, दुकानदार करतात. त्यामुळे यावर कडक कारवाई होणे आवश्‍यक आहे. हवेलीतील पूर्व भागातील सोरतापवाडी उरुळी कांचन, कुंजीरवाडी, बोरी आदी गावांत पिशव्यांचा वापर सुरू आहे. पुणे- सोलापूर महामार्गावर प्लॅस्टिक पिशवींचा वापर केला जात आहे. सोरतापवाडी येथील ग्राम स्वच्छता अभियानचे सरपंच सुदर्शन चौधरी म्हणाले की, आम्ही गावात दर रविवारी गाव स्वच्छता करीत आहे. कचऱ्याचे प्रमाण कमी केले आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने अनेकजण लग्नपत्रिकेत प्लॅस्टिकचा वापर करतात. मी मात्र, माझ्या लग्नाची पत्रिका पर्यावरणपूरक बनविली आहे. यामध्ये तुळशीच्या बीयांचा समावेश केला. लग्नसोहळा संपल्यावर ती लग्नपत्रिका 12 तास पाण्यात भिजत घालावी. यानंतर ते पाणी कुंडीतील मातीत टाकावी. त्यातून तुळस उगवणार आहे.
संतोष चौधरी व किरण वांझे, शैलेश बाबर म्हणाले की, उरुळी कांचन परिसरात 700 दुकानदारांना प्लॅस्टिक पिशवीचा वापर करू नये, असे पत्रक देण्यात आले आहे. मात्र, नंतर सरपंच व उपसरपंच यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळे पुन्हा प्लॅस्टिक पिशवीचा वापर उरुळी कांचनमध्ये वाढत आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)